राज्यातील सुमारे १७ लाख राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना तीन टक्के वाढीव महागाई भत्ता (डीए) १ जानेवारी २०१८ पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला आहे. हा वाढीव महागाई भत्ता १ ऑक्टोबर २०१८ पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात रोखीने देण्यात येणार आहे. राज्य सरकारने दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही भेट दिल्याचे बोलले जाते.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2yLFbzA
No comments:
Post a Comment