कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिक आज (मंगळवारी) येणार असल्याने केंद्र आणि राज्य पातळीवरील सर्व गुप्तचर यंत्रणा गेल्या दोन दिवसांपासून परिसरात तळ ठोकून आहेत. गेल्या वर्षी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष दक्षता घेतली जात असून, नक्षल प्रभावित भागातील गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी कोरेगाव भीमा येथे दाखल झाले आहेत.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines http://bit.ly/2RnCQXg
No comments:
Post a Comment