दूषित पाण्यातून संसर्ग होऊन लेप्टोची लागण झाल्यामुळे मुंबईत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जून महिन्यातील पावसाने लेप्टोमुळे तीनजणांचे मृत्यू झाले आहेत. जून अखेरीपर्यंत मुंबईमध्ये लेप्टोच्या एकूण पाच रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी जूनपर्यंत या आजाराचे एकूण २० रुग्ण आढळले होते. मात्र एकाचाही मृत्यू झाला नव्हता. मात्र यावर्षी एका आठवड्यात तीन जणांना लेप्टोमुळे जीव गमावावा लागला आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2yYKu2b
No comments:
Post a Comment