राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या ट्विटर अकाऊंटवरील एका फोटोमध्ये फोटोशॉपद्वारे फेरफार केल्याचा प्रकार रात्री उघडकीस आला. या फोटोच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठाची शनिवारी होणारी एफवायबीकॉमची परीक्षा रद्द झाल्याचा चुकीचा संदेश प्रसारित करण्यात येत होता. ही बाब निदर्शनास येताच विद्यापीठाने सर्व परीक्षा दिलेल्या वेळेवर होणार असून, कोणतीही परीक्षा रद्द झाली नसल्याचे स्पष्ट केले.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2JeNoDt
No comments:
Post a Comment