मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित कॉलेजांमध्ये विविध पारंपरिक, व्यावसायिक, कौशल्याधारित आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०१७-१८साठी २ लाख ६० हजार ७४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. हा गेल्या दशकातील उच्चांक होता. आता यावर्षीही विक्रमी प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यापीठाच्या वेबसाइटवर पदवीपूर्व व पदव्युत्तर पदवीसाठी तब्बल ४ लाख २२ हजार २६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यांनी १० लाख ७० हजार ८९५ अर्ज केले आहेत.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2LEyPXb
No comments:
Post a Comment