महाराष्ट्रातील महिला आणि युवतींच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने अभिनव प्रयोग राज्यात राबविण्याचा विचार सुरू केला आहे. महिला आणि तरुणींच्या संरक्षणासाठी त्यांना गळ्यात घालण्यासाठी सुरक्षेची पॅनिक बटन चेन उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. संकटकाळात मदतीसाठी पॅनिक बटन दाबल्यानंतर पोलिसांनी अडचणीत असलेल्या महिलांचे लोकेशन कळून मदत करणे शक्य होणार आहे. एक हजार रुपये किंमतीच्या अशा चेनवर सबसिडी देण्याचा सरकारचा विचार असल्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2zyLCr7
No comments:
Post a Comment